मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्‍या महिला विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांना हॉट स्टोन वेलनेस स्पा पहिला मजला-खारघर येथे मसाज स्पाच्या नावाने महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवण्यात आला. यावेळी त्या बनावट ग्राहकाकडून वेश्या व्यवसायासाठी 5 हजार रुपये स्वीकारले. यावेळी त्या ठिकाणी तीन पिडीत महिलांकडून बॉडी मसाज करण्याच्या नावाने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी जानवी उर्फ संध्या दिनेश चव्हाण (सेक्टर 16, खारघर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version