जगविख्यात मुष्टियोद्धा सिद्धिविनायकाचरणी नतमस्तक

| मुंबई । वृत्तसंस्था ।

जग जिंकणार्‍या बॉक्सरपैकी एक फ्लॉइड मेवेदर ज्युनियर सध्या भारताच्या दौर्‍यावर आहे. यादरम्याने तो मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाला. एवढेच नाही तर त्याने तेथे बाप्पाला फळे आणि शालही अर्पण केली. यानंतर पंडितांनी त्याला प्रसादाची टोपली दिली आणि गळ्यात शालही गुंडाळली. मेवेदरने गणपती बाप्पाच्या दरबारात डोके टेकवून दर्शन घेतले.

मेवेदर जगातील सर्वात श्रीमंत बॉक्सरपैकी एक आहे. त्याने 15 पेक्षा जास्त मोठ्या जागतिक स्पर्धा जिंकल्या आहेत. यावेळी सिद्धिविनायक मंदिरातील त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेवेदर भारतात येण्यासाठी खूप उत्साहित आहे आणि त्याने सोमवारी (दि.18) सांगितले होते की, मला यावर्षी भारतात सामने खेळायचे आहे. मेवेदरने बॉक्सिंगमध्ये भारतात आणि परदेशात अनेक विक्रम केले आहेत.

मूळचा अमेरिकेचा असलेल्या मेवेदरकडे 15 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि लीनल चॅम्पियनशिप विजेतेपद आहेत. तो 2017 मध्ये निवृत्त झाला आणि त्यानंतर त्याने अनेक प्रदर्शनीय सामने खेळले. 1996 च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने फेदरवेट प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याने तीन वेळा (लाइट फ्लायवेट, फ्लायवेट आणि फेदरवेट) यूएस गोल्डन ग्लोव्हज खिताब जिंकले आहेत.

Exit mobile version