वृक्ष संवर्धनातून पर्यावरणचे संरक्षण

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
आज देशात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जटिल बनत असल्याने वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षाचे संगोपन करणे ही महत्त्वाची बाब असून गेली अनेक वर्षे वसंतराव नाईक महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या मार्फत वर्षे वृक्षारोपण करुन देशाला चांगला संदेश देण्याचे काम करीत आहेत. वृक्षारोपण करुन जतन करणे तेवढे महत्त्वाचे आहे तरच पर्यावरणाचा संरक्षण होवू शकेल असे मत यावेळी मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्याचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमावेळी बोलत होते.

जागतिक ग्राहक दिवस हा ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा ग्राहक दिवस साजरा केला जातो. त्या बरोबर ग्राहक व ग्राहकचे हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक साधन म्हणून हा दिवस महत्वाचा असतो. हा दिवस साजरा करण्यामागे ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी होत असते.

महाविद्यालयाच्या प्रांगणात मुरुड तहसीलदार व मान्यवरांच्या हस्ते चिंच, आंबा, फणस, पेरू,इतर झाडेचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे, र् डॉ.विश्‍वास चव्हाण, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, श्रीशैल बहिरगुंडे, आर.नाखवा, अ‍ॅड.इस्माईल घोले, अतिक खतिब, डॉ.मधुकर वेदपाठक, डॉ.मुरलीधर गायकवाड, डॉ.सुभाष म्हात्रे, डॉ.नारायण बागुल, डॉ. देविदास रौदळ, विश्‍वजीत अहिरे, सचिन राजे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version