पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा रायगडात निषेध

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
एसटी कर्मचार्‍यांनी राष्ट्रवादीचे नेेेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या हल्ल्याचा शनिवारी रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. जिल्ह्यात पाली, तळा, पनवेल आदी ठिकाणी ही निदर्शने करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.

पाली तहसिलदारांना निवेदन
सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसिलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देऊन हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी  अध्यक्ष रमेश साळुंखे, पाली नगराध्यक्ष गीता पालरेचा, ग. रा. म्हात्रे, शहर अध्यक्ष अभिजीत चांदोरकर,  संदेश शेवाळे, साक्षी दिघे, रूपाली भणगे, प्रकाश कारखानीस, साधुराम साजेकर, सुलतान बेनसेकर, सुधाकर मोरे, आशिक मणियार, सुधीर भालेराव, सुशील शिंदे, किरण खंडागळे, सचिन मोरे, इम्तियाज पठाण, कमलाकर शिंदे, पप्पू परबलकर, इसाक पानसरे, किरण चव्हाण, डॉ. जयंत जाधव, डी. सी.चव्हाण, सुनिल राऊत, रुचिता बेलोसे, रचना जाधव व सूरज मेंडन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळ्यातही निषेध
पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा  तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करुन संबंधित हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी  तालुकाध्यक्ष नाना भौड,शहराध्यक्ष महेंद्र कजबजे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, पाणीपुरवठा सभापती मंगेश शिगवण, नगरसेवक अविनाश पिसाळ यांसह  पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री.शरदचंद्रजी पवार  यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. किशोर देवधेकर सरांच्या नेतृत्वात आज शनिवार दि.09 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता खांदा वसाहत मध्ये शांततेच्या मार्गाने मूक निषेध आंदोलन करण्यात आले .सदर प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकाऱी उपस्थित होते.

Exit mobile version