तहसीलदारांना निवेदन सादर
। तळा । वार्ताहर ।
महाड येथील इसाने कांबळे येथे करण्यात आलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तळा तालुका सकल हिंदू समाजातर्फे तळा तहसीलदार स्वाती पाटील यांना निवेदन देण्यात आले. महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे मंगळवारी, (दि.18) जून रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदा गोहत्या करण्यात आली होती, तसेच गोहत्या करणार्या कसाई व त्याच्या अन्य साथीदारांनी गोरक्षक व पोलिसांवरदेखील हल्ला केला होता. याचा निषेध म्हणून तळा तालुक्यातील सकल हिंदू समाजातर्फे तळा तहसीलदार स्वाती पाटील यांना निवेदन देण्यात आले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते.







