| माणगाव | प्रतिनिधी |
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दि. 23 एप्रिल 2025 रोजी श्रीराम नवमी उत्सव माणगाव व समस्त माणगावकरांतर्फे कॅण्डल मार्च काढत या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहशतवाद्यांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या कॅन्डल मार्चला माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार,नगरसेवक राजेश मेहता, नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती,नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक अजित तार्लेकर, अॅड. अनिकेत ठाकूर,सुजाता शेट, सिद्धांत देसाई,विक्रांत गांधी,अमोल पवार,श्रीराम नवमी उत्सव कमिटी पदाधिकारी व सदस्य तसेच समस्त माणगावकर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणगाव बाजारपेठेतील कचेरी रोड कॉर्नर ते वीर यशवंतराव घाडगे स्मारक असा कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेद व्यक्त करून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.