अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
8 जुलैला रात्री 8 ते 8.05 या वेळात आपल्या घरातील, परिसरातील दिवे बंद ठेवून फादर स्टॅन स्वामी यांच्या राज्य पुरस्कृत खुनाचा निषेध व्यक्त करण्याची विनंती भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्र राज्य समितीच्यावतीने करण्यात आली आहे. एन.एफ.आय. डब्ल्यु. केंद्रीय समितीने या कार्यक्रमास पाठिंबा देऊन सहभागी होण्याचे ठरविले आहे. फादर स्टॅन स्वामी यांचे निधन 5 जुलैला झाले. त्यांचे वय 84 होते.