अभियंतावर भ्याड हल्ल्याप्रकरणी निषेध

नगरपरिषद कामगार संघटनेकडून कारवाईची मागणी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

वसमत नगरपरिषदेचे स्वच्छता अभियंता- सौरभ युवराज हलममारे यांना काही अज्ञात लोकांनी शिवीगाळ करून लोखंडी रॉड डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा भ्याड हल्लाचा मुरुड-जंजिरा नगरपरिषद कामगार संघटना तर्फे निषेध करुन मारहाण करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुरुड-जंजिरा नगरपरिषद कामगार संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश आरेकर यांनी केली आहे.

यावेळी परेश कुंभार, मनोज पुलेकर, दिप्ती एरंडे, संजय बामुगडे, स्वप्नजा विरुकुड, आशिष पाटील, स्मिता मुरुडकर, अविनाश अवघडे आदींसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

प्रकाश आरेकर म्हणाले की, दैनंदिन जनतेशी संबंधित अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या कामगारांवर सात्यत्याने होणारे जीवघेणे हल्ले विचारात घेता पुन्हा पूर्वीप्रमाणे या सर्व अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचे संरक्षण करणारे कायदे पुनर्स्थापन करण्याची आवश्यकता आहे. हा कायदा अंमलात आला तर जनता शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ला करतेवेळी विचार करेल. तरच हे हल्ले थांबतील. तरी राज्य सरकारने याचा विचार करावा, अशा मागणीचं पत्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

Exit mobile version