| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सामजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रशांत हिंगणे हे दुय्यम निबंधक सुधागड-पाली कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरुद्ध 6 नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषण करणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी दि.5 रोजी दुय्यम निबंधक सुधागड-पाली यांना दिले आहे.
22 जून 2018 मध्ये अभिहस्तांतरण व मानीव अभिहस्तांतरण याची कार्यवाही संबंधित कार्यालयांनी कशाप्रकारे करायची याची माहिती देण्यात आली आहे. तरी दुय्यम निबंधक सुधागड-पाली कार्यालयाकडून अभिहस्तांतरण व मानीव अभिहस्तांतरण याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे सुधागड तालुक्यातील अपार्टमेंट, सोसायटी, गृहनिर्माण संस्थांंना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. दुय्यम निबंधक सुधागड-पाली यांच्याकडून सुधागड तालुक्यातील जनतेला दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात येत आहे, असे निवेदनात नमुद केले आहे. निर्णयाप्रमाणे अभिहस्तांतरण व मानीव अभिहस्तांतरण याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्या कार्यालयाकडून ती कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या बाबीचा गंभीरपूर्वक विचार करून जनतेला योग्य असे मार्गदर्शन, सहकार्य करण्यात यावेए अशी विनंती केली आहे.







