जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अब्दुल सत्तारांचा निषेध

सुधागडात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत असताना शिवीगाळ केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. सुधागड तालुक्यातील पाली तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढून कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या विरोधात मंगळवार (दि.8) रोजी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी. तसेच सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली. यावेळी सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रमेश साळुंके, संदेश शेवाळे, साक्षी दिघे, रुपाली भणगे, दादा कारखानीस, सुलतान बेणसेकर, सुधीर भालेराव, सुयोग गांडेकर, पपु परबलकर, दत्ता पालवे, डी सी चव्हाण, इसाक पानसरे आदींसह व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीवर्धन राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तारांचा निषेध

| श्रीवर्धन । वार्ताहर ।

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अत्यंत गलिच्छ व खालच्या पातळीची भाषा वापरल्याने श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य बाबत तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी मतदार संघ अध्यक्ष मोहंमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, अमित खोत, सूचीन कीर, सिध्देश कोसबे, प्रवीता माने, जितेंद्र सातनाक, राजसी मुरकर, प्रगती अदावडे, मंगेश कोमनाक, उदय बापट वृतिका हावरे, हिदायत कुदरूते, गणेश पोलेकर, कवीता सातनाक,शिवानी चौले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हसळ्यात सत्तारांचा निषेध

| म्हसळा । वार्ताहर ।

राज्याचे महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खा.सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेल्या शिवराळ वक्तव्याचा म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून जाहीर निषेध केला.

या वेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील, नगराध्यक्ष असहल कादिरी, संजय कर्णिक, छाया म्हात्रे, संदीप चाचले, मधुकर गायकर, रियाज घराडे, भाई बोरकर, सोनल घोले, रेश्मा कानसे, शगुप्ता जहांगीर, वृषाली घोसाळकर, सरोज म्हाशिलकर, शाहिद जंजीरकर, सलीम चोगले, महेश घोले, किरण पालांडे, नाना सावंत, अनिल बसवत, प्रकाश गाणेकर, शहनवाज उकये, मंगेश महशिलकर, कासीम मेमन, अकमल कादिरी, स्वप्निल चांदोरकर,भालचंद्र गाणेकर, रमेश डोलकर, मोरेश्‍वर पाटील, येशा काजारे, सतिश शिगवण, करण गायकवाड आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.

माणगावात राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तारांचा निषेध

| माणगाव । वार्ताहर ।

माणगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा मंगळवारी निषेध करण्यात आला. सत्तार यांच्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कारवाई करावी अशी मागणी करीत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. माणगावमध्ये तालुका व शहर पुरुष व महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हॉटेल आनंद भुवन याठिकाणी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला तालुकाध्यक्षा संगीता बक्कम, नितीन वाढवळ, योगिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन त्यानंतर सकाळी 11 वाजता नवीन बसस्थानक माणगाव समोर मुंबई-गोवा महामार्गावर जोरदार आंदोलन करीत घोषणाबाजी करीत सत्तार यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

यावेळी शेखर देशमुख, विष्णू सावंत, आनंद यादव, गणेश पवार, काका नवगणे, उदय अधिकारी, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, गणेश चव्हाण, राजू मोरे, नामदेव कासारे, रुपेश तोडकर, रिया उभारे, रश्मी मुंढे, सुविधा खैरे, सुशीला वाढवळ, विशाखा यादव, श्रद्धा यादव, तुळसा पवार, संदीप जाधव, किरण पागार, जयंत बोडरे, राजेंद्र शिर्के, राजेंद्र जाधव, महादेव खडतर, इकबाल हर्णेकर, नितीन घोणे, स्वप्नील सकपाळ, सुमित काळे, संतोष यादव, सौरभ खैरे, सिद्धांत देसाई, तुषार करकरे, चेतन गव्हाणकर, विलास यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रसायनीत सत्तारांच्या पुतळ्याचे दहन

| रसायनी । वार्ताहर ।

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने रसायनी पाताळगंगा परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आघाडी अध्यक्षा उमा संदिप मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा प्रवेशव्दाराजवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सत्तारांचा जोडो मारुन पुतळा जाळून निषेध केला.

मोहोपाडा प्रवेशद्वारावर सोमवारी सायंकाळी सात वाजता महिलांसह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत अब्दुल सत्तार यांच्या बॅनरला महिलांनी आपापल्या चपला काढून जोडो मारो आंदोलन केले यानंतर अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा रंजना धुळे, रेश्मा चौधरी, वर्षा शिंदे, शारदा काळे, कविता शिंदे, रेश्मा मेमन, सोनाली गोपाळे, पुर्वा खाने, वंदना थोरवे, कांचन सोनावणे, सूरेखा कांबळे, राष्ट्रवादी वासांबे विभाग अध्यक्ष अनिल पिंगळे, संतोष मांडे, रोशन म्हात्रे, केदार शिंदे, प्रतिक हिवराळे, जयेश वासनिक, नयन म्हात्रे, योगेश म्हात्रे, नितिन पाटील, पांडुरंग गायकवाड, कुमार राठोड आदी उपस्थित होते.

महाडमध्ये राष्ट्रवादीतर्फे सत्तारांचा निषेध

| महाड | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह अपशब्द कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा महाड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली व त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या प्रतिमेचे दहन करून जाहीर निषेध व्यक्त केला. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अपेक्षा कारेकर, बुवा जाधव, काका वैष्णव, मन्सूर देशमुख, निलेश महाडिक, जयेश देशपांडे, महेंद्र शिंदे, अनंत तांबे, विलास, कृष्णा कळंबे, अध्यक्ष राकेश शहा, जानवी विचारे, रिहान देशमुख,हर्षली शिर्के, प्रशांत खोपकर, धिरज पाटील, कौस्तुभ धरिया आदि उपस्थित होते.

अब्दुल सत्तारांचा रोह्यात निषेध

| धाटाव । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.

या आंदोलनात आ. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, मधुकर पाटील,विजय मोरे, विनोद पाशीलकर, प्रीतम पाटील, जयवंत मुंढे यांसह विविध भागातील/शहरातील कार्यकर्ते, महिला आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

खोपोलीत राष्ट्रवादीचेचपलामारो आंदोलन

| खोपोली । प्रतिनिधी ।

महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. खोपोली शहरातील महिला पदाधिकारयांनी जुन्या महामार्गावर सत्तार यांच्या फोटोला चपला मारो आंदोलन करीत अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

शहरातही महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली बाजारपेठेत आंदोलन करीत मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर सत्तार यांच्या फोटोला चपला मारो आंदोलन करण्यात आला. याप्रसंगी रायगड जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका केविनाताई गायकवाड, दिपाली भोसले, प्रतीक्षा नाईक, वैशाली भोसले, अश्‍विनीत ढोळे, प्रज्ञा महाडिक,कामिनी जाधव, सायली गायकवाड महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Exit mobile version