। पनवेल । वार्ताहर ।
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल डिझेल दररोज वाढत असलेले दर त्यामुळे होणारी महागाई याचा जाहीर निषेध करण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे गुजरात येथील दलित चेहरा म्हणून उदयास आलेले आ. जिग्नेश मेवाणी यांना बेकायदेशीररित्या केलेली अटक याचा निषेध करण्यासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने निषेध मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी कॅप्टन कलावत, मल्लिनाथ गायकवाड, अनंत पाटील, निर्मला म्हात्रे, मोहन गायकवाड, हेमराज म्हात्रे, मंजुळा कातकरी, पूजा मोहन, सुधीर मोरे, विश्वनाथ चौधरी, विजय केणी, नीता शेणोय, जयश्री जळगावकर, किरण तळेकर, आशुतोष, सागर पगारे, जोश जेम्स व अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.