| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
बैलप्रेमी सेवाभावी संस्था-मुंबई रायगड, ठाणे, पालघर यांच्या विद्यमाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली होती. डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावरील हेदूटने गावाजवळ बैलगाडा चालकांनी रस्त्यावर उतरून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. या निषेध यात्रेत पाकिस्तानविरोधात घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दहतवाद्यांना पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील हेदूटने गावात ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील बैलगाडा मालक एकत्र आले होते. सर्व बैलगाडा मलकांनी एकत्र येऊन या हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद्यांना आश्रय देणार्या पाकिस्तानविरोधात तीव्र घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी, उपाध्यक्ष पप्पू पाटील, आकाश राऊत, आप्पा गायकवाड, नांदराज मुंगजी, कार्याध्यक्ष विजय खाणावकर, खजिनदार अविनाश पवार, सोनू भोपतराव, विशाल खाणावकर, संजय जाधव, संचालक बंट्या म्हात्रे, सचिव भूषण धुळे, समालोचक सुरेश शेठ फुलोरे यांच्यासह बैलगाडा चालक-मालक संघटना कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, पनवेल, मुरबाड, पेण व उरण व असंख्य नागरिक उपस्थित होते.