‘जंतर मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही’

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

दिल्लीत आंदोलनासाठी प्रसिद्ध असणारे जंतर मंतर आता आंदोलनासाठी वापरता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जंतर मंतर ऐवजी आंदोलन आणि निदर्शनांसाठी रामलीला मैदान, बुऱ्हाडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सीजेपीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांना आंदोलन आणि निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी योग्य पर्यायी ठिकाणे निश्चित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या शिफारसींच्या आधारे आंदोलनाच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Exit mobile version