दिघी पोर्टमध्ये भूमिपुत्रांना रोजगार द्या

आगरी समाज अठरा गाव युवा संघटनेची मागणी
। कापोली । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बहुचर्चित दिघी पोर्टमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी आगरी समाज अठरा गाव युवा संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष धनंजय चौलकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने पोर्ट व्यवस्थापनाकडे केली.

यावेळी सुभाष चौलकर, आदेश धुमाळ, हरीश पयेर, सुहास पाटील, गिरीश पाटील, निशित गायकर, हेमंत नाक्ति, उदेश म्हात्रे, अक्षय चाळके, मयूर बिराडी, सुजित पयेर, नामदेव शितकर, जयेश पयेर, दिनेश पयेर, नितीन कांबळे, किरण पाटील, रघुनाथ भायदे, मनोहर पाटील, विवेक भायदे, अजिंक्य भायदे, विशाल भायदे व युवक उपस्थित होते.

श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुशिक्षित तरुण बेरोजगारी वाढल्याने मानसिक तणावाच्या परिस्थितीत घरीच आहेत. हाताला काम मिळावे, म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. या बेरोजगार युवकांच्या हक्कासाठी म्हसळा-श्रीवर्धन अठरा गाव आगरी युवा संघाने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी श्रीवर्धन परिसरात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये स्थानिकांनाच रोजगार दिला जावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून दिघी पोर्ट अदानी प्रकल्पामधील विविध कंपन्यामध्ये शासनाच्या नियमानुसार 80 टक्के नोकरी स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या पात्रतेनुसार मिळवून देण्यासाठी दिघी पोर्ट अदानी कंपनीच्या व्यवस्थापकांच्या कार्यालयावर धडक मारण्यात आली.

बहुतांशी आगरी तसेच स्थानिक युवकांना नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. दिघी पोर्ट अदानी कंपनीमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे होणार्‍या या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी कंपनी व्यवस्थापनाने दिघी पोर्ट कंपनी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर उपलब्ध होणारी रोजगाराची संधी ही स्थानिक युवकांनाच देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र याबाबत गांभीर्याने विचार न झाल्यास भविष्यात भूमिपुत्रांच्या हक्कासाठी हजारो युवकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यवस्थापक कमिटीला देण्यात आला.

Exit mobile version