पर्यटकांना चांगल्या सुविधा देणार

टॅक्सी संघटनेचे सहकार्याचे आश्‍वासन

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. त्यावेळी नेरळ माथेरान प्रवासी टॅक्सी सेवा देणारे टॅक्सी चालक यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली होती. दरम्यान, नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेने पर्यटकांना सुखरूप आणि सुरक्षित तसेच चांगली सुविधा दिल्या जातील, असे आश्‍वासन दिले आहे.

पारशी नूतन वर्ष, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला हे सण एकामागोमाग आले असून, त्यानिमित्त असणार्‍या सलग सुट्ट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे. त्यानिमित्त नियोजन करण्यासाठी पोलिसांनी येथील टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना त्यांचे मदतनीस येथे कार्यरत ठेवावेत, अशी विनंती केली असून, पर्यटकांच्या गाड्यांना पार्किंगमध्ये जाण्यासाठी रस्ता खुला करावा, अशा सूचनाही आहोत. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे म्हणून वाहनतळाचे नियोजन करून यांनी सर्व सहकार्य करण्याचे, तसेच पर्यटकांच्या जास्तीत जास्त गाड्या कशा बसतील, पर्यटकांना वाहनतळात आल्यानंतर प्रवेशद्वारात त्रास होऊ नये, यासाठी जास्त कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत, असे सांगितले. वनविभागाच्या कर्मचार्‍यांना तसेच पालिकेच्या कर्मचार्‍यांना पार्किंगबाबत विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. टॅक्सीवाल्यांना रस्त्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

Exit mobile version