अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगडमध्ये सातत्याने येणार्या नैसर्गिक आपत्तीबाबत मदत करताना रस्ते खराब असणे, वातावरण खराब असते, रस्ते बंद असतात. येणार्या अडचणींचा सामना करण्यासाठी एनडीआरएफसाठी बेस कॅम्प उभारण्यात येणार आहे. रेवसपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड्डीपर्यंत 740 किलो मीटर सागरी मार्ग काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 9573 कोटी खर्चाची तरतूद केली आहे. रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क उभारण्याचा निर्णय घेत काशीद व इतर ठिकाणी जेट्टी विकास कार्यक्रम घेतला आहे. पर्यटन विकास अष्टविनायक महड, पाली विकासासाठी निधी देत आहोत. जिल्हा आदिवासी विश्राम विभागामार्फत मॉडेल आश्रमशाळा सुरू करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवेआगर येथील कार्यक्रमा प्रसंगी दिली. न्हावा- शेवा शिवडी प्रकल्प 2022 ला होणार पूर्ण
श्यामराव पेज आर्थिक महामंडळामार्फत 50 कोटीची तरतूद करीत आहोत. ठाणे खाडीला समांतर सुमारे 15 किलोमीटर कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. न्हावा- शेवा शिवडी प्रकल्प 2022 ला पूर्ण करण्याचे ध्येय मुख्यमंत्री व महविकास आघाडीच्या सरकारने ठेवले आहे. कोकणात निसर्ग पर्यटन धोरण जाहीर केले आहे.