। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शिहू-बेणसे विभागाची विजसमस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे दिसून येते. वर्षाचे बारा महिने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा कोणत्याही ऋतूत विजबत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो. वर्षानुवर्षे वीज वितरण विभागाकडून जनतेला वेठीस धरले जात आहे. वीज समस्ये संदर्भात मंगळवारी (दि.2) बेणसे सिध्दार्थ नगर येथे बैठक पार पडली.
या बैठकीत वीज वितरण विभागाने दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर पेण वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घालू, असा इशारा यावेळी देण्यात आला. तर, विजवीतरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट असून दोन दिवसात उपाय करा अन्यथा वीज वितरण अधिकार्यांना कोंडून ठेऊ, असा ही इशारा देत महिला आणि तरुण आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी बबन अडसुळे, अ.का. हात्रे, विजय एटम, अनंत भुरे, अनिल शिंदे, उत्तम सावंत, योगेश अडसुळे, सुरेश भगत, सुनील पवार, प्रशांत गोरे, महेंद्र ठाकूर, हरेश पाटील, अनंत पाटील, नरहरी ठाकूर, प्रवीण म्हात्रे, सौ. कल्पना अडसुळे, सुमन अडसुळे, कविता अडसुळे, छायाबाई सावंत, पद्माआई अडसुळे, सुषमा अडसुळे, आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.