दिव्यांग मतदारांना मतदाना विषयी जनजागृती

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणूकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने स्वीप अंतर्गत शहरभर विविध अभियान राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुरूड जंजिरा नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग मतदारांच्या घरी भेट देऊन तसेच कार्यालयामध्ये येणार्‍या दिव्यांग मतदारांना मतदान यंत्र विषयी जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे, नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक – राकेश पाटील, प्रशासकीय अधिकारी- परेश कुंभार, लिपीक मनोज पुलेंकर, सिटी को-ऑर्डीनेटर – सचिन कोरके, दिपक शिंदे, निलेश शेडगे इ.नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करीता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दिव्यांग मतदारांची विशेष काळजी घेऊन मतदाना विषयी प्रोत्साहन देण्याकरीता विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्या दृष्टीकोनातून प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिल चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच टपाली मतदान करू इच्छीणार्‍या दिव्यांगांना टपाली मतदानाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरपरिषदेमार्फत दिव्यांग मतदारांविषयीचा हा उपक्रम हाती घेण्यात आलेला असे नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी वेळी सांगितले.

Exit mobile version