स्वच्छता मोहिमेत मतदानाबाबत जनजागृती

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली नगर परिषद अंतर्गत स्वच्छता मोहिमेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यामुळे तरी शंभर टक्के मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांनी केले. वरची खोपोली प्रभाग ते मुंबई पुणे महामार्गावरील हनुमान मंदिर मुळगाव यादरम्यानच्या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात स्वच्छतेची शपथ मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी उपस्थित अधिकारी वर्ग व कर्मचार्‍यांना दिली.

मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य अधिकारी गौतम भगले, पथदीप विभागाचे सुरेश तरडे, उद्यान विभागाचे निलेश लोखंडे, नगर रचना विभागाचे प्रणय ठाकूर, लेखा विभागाचे सिद्धार्थ खामकर, आरोग्य विभागाचे युवराज विरनक, बांधकाम विभागाचे अनिल वाणी यांच्यातील सह सर्व कर्मचारी वर्गाने या स्वच्छता विशेष मोहिमेत सहभाग घेतला. शहर स्वच्छ राखण्याबाबत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, आपले परिसर स्वच्छ ठेवावे, झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे महत्त्व समजून घ्या, यावर इतर अनेक जनजागृतीच्या बाबतीत मुख्याधिकारी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version