‘स्वयंसिद्धा’ च्या कलाकारांतर्फे जनजागृती

| पोलादपूर | वार्ताहर |

जिल्हा आरोग्य विभाग रायगड अलिबाग जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड अलिबाग यांच्या अंतर्गत डॉक्टर अंबादास देवमाने जिल्हाछल्यचिकित्सक रायगड व संजय माने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली ”बंधने पाळा, एड्स टाळा” या पथनाट्यातून महाड बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमास महाड आयसीटीसी धनश्री नितिश महाबळेश्वरकर समुपदेशक ग्रामीण रुग्णालय महाड, वासंती पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सुपरवायझर समीर सुतार , लिंक वर्कर अश्विनी बाळगुडे, स्वयंसिद्धा संस्थेचे किरण साळवी तसेच पथनाट्य कलाकार श्रुती नाईक, पार्थ म्हात्रे, यश म्हात्रे, निशांत नवखारकर, राज पाटील, ईशा ठाकूर, मेहविश कासुकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता ग्रामीण रुग्णालय महाड येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version