युवा सप्ताह निमित्त अलिबागेत जनजागृती

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताहाचे औचित्य साधून अलिबाग येथे जनजागृती करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड अलिबाग यांच्या सहकार्याने प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या माध्यमातून क्षेत्रीय प्रचार अधिकारी केंद्रीय संचार ब्यूरो अहमदनगर फनीकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग बसस्थानक येथे ही जनजागृती करण्यात आली. कलावंतांनी कलापथकातून व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाओ, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, आरोग्य यांसह विविध विषयांवर जनजागृती केली.

या पथनाट्यात प्रिझम सामाजिक विकास संस्थेचे आठ कलाकार सहभागी झाले असून सदर कलापथकाचे नेतृत्व प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील कर्मचारी व अलिबाग आगार येथील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.

Exit mobile version