खोपोलीत ‘लेक लाडकी’ योजनेची जनजागृती

| खोपोली | प्रतिनिधी |

‘लेक लाडकी’ ही महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली योजना आहे. या योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, फायदे, नियम व अटी अर्ज अशी संपूर्ण माहिती सर्वांना मिळावी यासाठी एकात्मिक बालविकास सेवा संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हाळ उर्दू शाळेत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांना पथनाट्याच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेचे महत्त्व पटवून दिले.

दरम्यान, माजी नगरसेविका वैशाली जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सुजाता यादव यादव यांनी लेक लाडकी योजनेची माहिती प्रास्ताविकातून दिली. या कार्यक्रमासाठी हाळ गावातील महिला, लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होती. सर्वांची माहिती माजी नगरसेविका वैशाली जाधव यांनी करीत लेक लाडकी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी मदत करू, असे आश्‍वासन दिले.


एकात्मिक बाल प्रकल्प रायगड अंतर्गत खोपोलीतील 15 अंगणवाड्या व त्यातील 15 सेविका व 15 मदतनीस आहेत. हा कार्यक्रम लेक लाडकी योजना ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात आला. प्रत्येक अंगणवाडीत 30 ते 35 लाभार्थी आहेत. त्यांना रोज गरम ताजा आहार व सुका खाऊ वाटण्यात येते.

सुजाता यादव,
अंगणवाडी सेविका
Exit mobile version