वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती

| म्हसळा | वार्ताहर |

देशभरात 11 ते 17 फेब्रुवारीच्या दरम्यान वाहतूक सुरक्षा सप्ताह पाळला जातो. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिस शाखेकडून प्रबोधनात्मक जनजागृती करण्यावर यावेळी विशेष भर दिला जाणार आसल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यानी सांगितले. यावेळी म्हसळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता बांडे आणि स्थानिक वाहतूक विभागाचे हेड कॉन्स्टेबल विनायक चांदोरकर यानी आज वसंतराव नाईक कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविला.

रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करताना नागरिकांत जागरूकता निर्माण करणे, समुदायांना शिक्षित करणे आणि रस्ता सुरक्षेची संस्कृती वाढवणे या उद्देशाने सुरक्षा सेवांची विस्तृत श्रेणी देताना आम्हाला आनंद होतअसतो, असे पवार यानी सांगितले. अशाच प्रकारे प्रवासी वाहतुकदारांजवळ वार्तालाप करताना पवार यांनी आम्ही प्रवासी, व्यवसायिक आणि वाहतूक विभाग हे परस्परांशी संबधीत आहेत. त्यानी प्रवासी वाहतूक करताना सयंमाने वागावे आणि कायद्याचे पालन करावे. म्हसळा शहरांत रिक्षा-मिनीडोर वाहतूक संघटनेची प्रथम स्थापना करा, कोणत्याही प्रकारे कायदा हातांत घेणे हा चुकीचा मार्ग होतो, अन्य वाहतुकदारांबाबत तक्रार आसल्यास वाहतुक शाखेकडे किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला करावी, असे सांगितले.

शहरांत मिनीडोर सुमारे 90 ते100 आहेत. तर रिक्षा सुमारे 250 आहेत. त्यांच्यासाठी बाह्यवळण रस्ता, पोलीस स्टेशन, पाभरे मार्ग, दिधी रोड असे 4 थांबे आहेत. भविष्यात थांबे वाढविण्यासाठी नगरपंचायतीकडे मागणी लावून धरणार आसल्याचे संघटनेचे पदाधिकारी ऐजाज घरटकर यांनी सांगितले. यावेळी अमोल जंगम, मकबूल रज्जफ, हुसेन दोंदीलकर, इश्तीयाक दामाद, विजय जंगम, अभिषेक शितकर आदी रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते.

Exit mobile version