जिल्हा पुरवठा विभागातर्फे पथनाट्यातून जनजागृती

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग समुद्र किनार्‍यावर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यावतीने ‘जागो ग्राहक जागो’ या पथनाट्यातून ग्राहकांचे अधिकार व ग्राहक संरक्षण अधिनियम – 2019 याविषयी जनजागृती करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे ज्ञानदेव यादव, मानसी पाटील, तपस्वी नंदकुमार गोंधळी, विनायक सर्णेकर, नयन नाईक, हेमंत पाटील, दीपक मुळे, प्रेरणा पाटील, अनेश पाटील, गणेश पाटील, विजय नाईक, दिलीप शहापूरकर- अव्वल कारकून आदि उपस्थित होते. या पथनाट्यातून कलाकारांनी अलिबाग समुद्र किनार्‍यावर व अलिबाग बस स्थानक येथे जनजागृती केली. पथनाट्यात प्रतिक कोळी, विराज म्हात्रे, साक्षी पाटील, नेहा म्हात्रे, सार्थक गायकवाड, वैष्णवी नागे आदी कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमास शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विनायक सर्णेकर यांनी केले होते.

Exit mobile version