व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी जनजागृती

पोलीस, लायन्स क्लबचा पुढाकार
| खोपोली | प्रतिनिधी |
व्यसनामुळे विद्यार्थीदशेत युवा पिढी वाया जात आहे. दारू किंवा अमली पदार्थाचा वापर केला जातो. पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत अशा काही कारणांमुळे व्यसनाधीनता हा मानसिक रोग होत व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त खोपोली पोलिस आणि लायन्स क्लब ऑफ खोपोली यांच्या विद्यमाने ड्रग्स जनजागृती कार्यक्रम बुधवारी 2 मार्च रोजी लायन्स क्लब हॉल येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली, खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश कळसेकर, नगरपालिका शिक्षणाधिकारी जमश्री धायगुडे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्पा ला. दिलीप पोरवाल व्यासपीठावर उपस्थित होते.तर सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,सामाजिक संघटनांचे सदस्य तसेच मेडीकल चालक उपस्थित होते.

खोपोली शहरातील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी घरोघरी जावून जनजागृती करणार असल्याचे लायन्स क्लबचे प्रोजेक्ट व्यवस्थापक दिलीप पोरवाल यांनी प्रास्ताविकातून सांगितले. चटकन नशा, गुंगी आणणारे पदार्थ याचा वापर वाढला आहे आणि हे खूप महागडे यामध्ये अल्कोहोल, चरस, गांजा, सिगारेट, ड्रग्स, कोकेन, ओपीऑईडस् याशिवाय व्हाईटनर, ब्राऊन शुगर यांसारख्या वेगवेगळ्या नशा वेगवेगळ्या माध्यमातून करत असल्याचे आढळून येत आहे. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे. याचा वापर मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे.

Exit mobile version