‘स्वीप’ अंतर्गत जनजागृती

तहसीलदार घोरपडे यांच्या नियोजनातून कार्यक्रम

| पोलादपूर | प्रतिनिधी |

राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील 51 मतदान केंद्रांवर ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले आहे. 27 मतदान केंद्रांवर आतापर्यंत मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील 51 पैकी 27 मतदान केंद्रांमध्ये ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन केले असून, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, महिला मेळावा, गृहभेटी आणि प्रभातफेरी आदी उपक्रम या मतदार जनजागृती कार्यक्रमातून राबविले जात आहेत.

पोलादपूर तालुक्यातील सवाद 1 व सवाद 2, धारवली, कामथे, कालवली, लोहारे 1 व लोहारे 2, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, तुर्भे खोंडा, गोवेले, वझरवाडी, पोलादपूर 1, पोलादपूर 2, पोलादपूर 3, पोलादपूर 4, पोलादपूर 5, पोलादपूर 6, काटेतळी, सडवली, रानवडी बुद्रुक, बोरावळे 1, बोरावळे 2, घागरकोंड, साखर, उमरठ, ढवळे, करंजे, देवळे, वाकण 1, वाकण 2, कापडे बुद्रुक 1 व कापडे बुद्रुक 2, धामणदिवी, महाळुंगे, केवनाळे, रानकडसरी, दाभिळ, कापडे खुर्द, देवपूर, भोगाव खुर्द, चांभारगणी बुद्रुक, निवे, पैठण, महारगूल, परसुले, कोतवाल खुर्द, कोतवाल बुदु्रक, कुडपण बुद्रुक, पळचिल या 51 केंद्रांमध्ये 4 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 पर्यंत ’स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती तहसिलदार कपिल घोरपडे यांनी दिली.

Exit mobile version