लोकसेवा आयोग परीक्षांचे वेळापत्रक

| नाशिक | वार्ताहर ।

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in, https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित करतांना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणार्‍या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणार्‍या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

Exit mobile version