। महाड । प्रतिनिधी ।
साहित्यिक आणि इतिहासप्रेमी डॉ.प्रेम हनवते लिखित गोपाळबाबा वलंगकर, आंबेडकरी चळवळीचे आधारवड या पुस्तकाचे प्रकाशन महाड तालुक्यातील रावढळ या गावांमध्ये नुकतेच करण्यात आले. गोपाळबाबा वलंगकर हे अस्पृश्य समाजांतील पहिले पुढारी, पत्रकार आणि साहित्यिक होते. गोपाळबाबा वलंगकर यांच्या जीवनावर गेली सहा वर्षे संशोधन करण्यात आल्यानंतर या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. महाड तालुक्यातील रावढळ येथील गोपाळबाबा वलंगकर हे आंबेडकरी चळवळीपुर्वी दलितांच्या उद्धारासाठी काम करणारे नेते होते. त्यांच्या जीवनावर आता पर्यत अल्प स्वरुपांमध्ये लिखाण करण्यात आले होते, परंतु इतिहास तज्ञ आणि शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक या विषयावर गेली सहा वर्षे डॉ.पे्रम हनवते संशोधन करीत असुन लवकरच त्याही पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. गोपाळबाबा वलंगकर आंबेडकरी चवळवळीचे आधारवड या पुस्तकासाठी त्यांनी अनेक संदर्भ, संबंधित व्यक्ती, समाधी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करुन पुस्तकाचे लिखाण केले असल्याचे डॉ.हनवते यांनी सांगितले. मनुस्मृती दहन स्मृती दिनाचे औचित्य साधुन या पुस्तकाचे प्रकाशन रावढळ या गावांमध्ये करण्यात आले. यावेळी रावढळ भावकीचे अध्यक्ष अर्जुन जाधव, बबन जाधव, गंगाधन साळवी, सखाराम जाधव, लक्ष्मण जाधव, अनिल जाधव, मुकेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकाचे लेखक डॉ.हनवते यांनी आपल्या भाषणांमध्ये गोपाळबाबा वलंगकर यांचे जीवनकार्य उर्वरीत महाराष्ट्राला माहिती व्हावी या उद्देशाने सदरचे पुस्तकाचे लिखाण करण्यात आले असल्याचे सांगितले. गोपाळ बाबा वलंगकर हे पहिले विद्रोही पत्रकार, साहित्यिक होते, समाजाला पथदर्शी आणि प्रेरणा देणारे दिपस्तंभ आहेत असे ते म्हणाले, पुढील वर्षा पासुन गोपाळबाबा वलंगकर समाजप्रबोधन पुरस्कार देखिल देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. गोपाळबाबा वलंगकर हे जेष्ठ समाजप्रबोधनकार होते. दुर्दैवाने त्यांच्या जीवनावर अतिशय कमी प्रमाणांमध्ये लिखाण झाले असल्याची खंत प्रभाकर भुस्कुटे यांनी व्यक्त केली.