। अलिबाग । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका उपाध्यक्ष धनंजय कवठेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त तयार केलेल्या आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते गुरुवारी (9 सप्टेंबर) अलिबाग येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, जिल्हा संघटक ऋषिकांत भगत, तालुका उपाध्यक्ष धनंजय कवठेकर, जयेंद्र भगत, जगदीश घरत, शैलेस चव्हाण, संदीप गोठीवरेकर, संजय वानखेडे, हेमनाथ खरसंबळे, तालुका युवक अध्यक्ष मनोज शिर्के, ग्रामपंचायत गोवेचे सरपंच महेंद्र पोटफोडे, राज ढवळे, सर्व वृत्तपत्र, वाहिन्याचे पत्रकार आदी उपस्थित होते.