चिरनेर येथे दिनदर्शिकांचे प्रकाशन

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर येथील तिरंगा पतसंस्थेच्या व मोठेभोम येथील अष्टविनायक मित्र मंडळ तसेच अष्टविनायक महिला मंडळ यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनदर्शिकांचे प्रकाशन मंगळवार 26 डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. हे प्रकाशन चिरनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन घबाडी यांच्या हस्ते चिरनेर येथील तिरंगा पतसंस्थेच्या दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले सभागृहात करण्यात आले. यावेळी घबाडी यांनी तिरंगा पतसंस्था आणि अष्टविनायक मित्र मंडळ करीत असलेले संघटनात्मक व सकारात्मक कार्य गौरवास्पद असल्याचा उल्लेख केला. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन अलंकार परदेशी, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन घनश्याम पाटील, चिरनेर ग्रामपंचायतीच्या भारती ठाकूर, वनिता गोंधळी, मनोज ठाकूर, किशोर केणी, बाळकृष्ण ठाकूर, डॉ. सुधीर केणी, विजय केणी, सुभाष कडू, चंद्रकांत गोंधळी, रवींद्र म्हात्रे, आतिष पाटील, विश्वास मोकल, राजेंद्र पाटील, जगदीश ठाकुर तसेच तिरंगा पतसंस्थेचे पदाधिकारी आणि अष्टविनायक मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते

Exit mobile version