| उरण | वार्ताहर |
उरण येथे ‘रायगड तोफ’ या दिवाळी अंकाचे नुकतेच ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वर भोईर यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी ‘रायगड तोफ’ दिवाळी अंकांचे संपादक रामचंद्र म्हात्रे, शेकाप शहर चिटणीस शेखर पाटील, शेकापच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत यांच्यासह तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, चाणजे उपसरपंच प्रदीप नाखवा, शहर अध्यक्ष नयना पाटील, सई पाटील, लहू शिंदे, होमगार्डचे अध्यक्ष नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या दिवाळी अंकास शुभेच्छा दिल्या.