| चिरनेर | प्रतिनिधी |
‘मंजुळाक्षरे’ म्हणजे मृदू आवाजात आलेली जणू मंजुळ अक्षरे आहेत, असे प्रतिपादन रायगड भूषण प्राध्यापक एल.बी. पाटील यांनी केले आहे. चिरनेर येथील कवयित्री मंजुळा म्हात्रे यांच्या ‘मंजुळाक्षरे’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि.10) पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनातपार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘मंजुळाक्षरे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना एल.बी. पाटील म्हणाले की, मंजुळा म्हात्रे या कवयित्रीची ही कविता जन्मापासूनच कागदावर उतरली आहे. त्यांच्या कवितेचा गुरु कोण असेल, तर ती त्यांची आई आहे. आईनेच त्यांना कवितांच्या संस्कारांचे बालकडू पाजलेले आहे. म्हणूनच त्यांच्या कवितांमध्ये ठाई ठाई प्रज्ञेचे प्रतिबिंब अनुभवला मिळते. त्यांचा कवितासंग्रह मातीशी नाते सांगणारा असून, मानवी मनाला हात घालणारा असून, नवतेचे शाल पांघरलेले विचार या कवितांमधून सर्वांनाच रोमांचित करतात, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला उद्योगपती पी.पी. खारपाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तर, व्यासपीठावर कवयित्री मंजुळा म्हात्रे यांच्यासह सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, माजी जि.प. सदस्य संतोष ठाकूर, शेकापचे तालुका चिटणीस सुरेश पाटील, संजय पाटील, अलंकार परदेशी, अनिल नारंगीकर, शेकापक्षाचे कार्यकर्ते नित्यानंद मोकल, निशिगंधा मोकल, सौरभ पाटील, निखिल मोकल, अंकिता म्हात्रे, वैभव म्हात्रे, कविता म्हात्रे, उषा म्हात्रे, धनंजय म्हात्रे, राष्ट्रवादीचे संतोष ठाकूर यांच्यासह वैशाली कदम, सलोनी बोरकर, लालसिंग वैराट, वैभव धनावडे, सुनील चिटणीस, स्मिता हार्डीकर व चिरनेर गावातील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





