पेण न्यायालयात स्मरणिकेचे प्रकाशन

| पेण | वार्ताहर |
पेण बार असोसिएशनच्या विद्यमानाने पेण सत्र न्यायालयाच्या सभागृहात पेण बार असोसिएशन च्या कार्याच्या अहवालाच्या स्मरणिकेचे प्रकाशन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे, पेणच्या प्रमुख दिवाणी न्यायाधीश रुबिना मुजावर, सह दिवाणी न्या.प्रितेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ डी.जी.पाटील, निवृत्त न्या. डी.पी.म्हात्रे, प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे,नायब तहसिलदार नितीन परदेशी,पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोल, वडखळ पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर, दादर पोलिस निरीक्षक गोविंद पाटील, माजी जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील यांच्यासह पेण विधी समितीला मदत करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष नंदू म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पेण तालुका विधी सेवा समितीला ज्यांनी ज्यांनी मदत केली व त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा विशेष सत्कार केला.

Exit mobile version