1942 चिपळूण पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण । वार्ताहर ।

लोकमान्य टिळक वाचनमंदिराच्या आप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे 9 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता वाचनालयात 1942 चिपळूण या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

स्वातंत्र्य आंदोलन काळात येथील सत्याग्रहात पोलिसाच्या लाठी हल्ल्याविरुद्ध झालेल्या हल्ल्यात दाखल झालेले आरोपपत्र (चार्जशीट) आणि त्यावरील रत्नागिरीतील सेशन कोर्टाचा वाचनालयाकडे संग्रहित असलेला निकाल माजी अध्यक्ष तात्या कोवळे यांनी मिळवला होता. हा खटला मामलेदार लांबाते यांच्यासमोर चालला होता. या संघर्षात त्यांना व त्यांच्या समवेत असलेल्या पोलिसांना मारहाण झाली होती. रत्नागिरीचे सेशन जज एन. एम. मियाभॉय यांनी 10 मे 1943 ला याबाबत निकाल दिला होता. 23 पैकी 15 जणांना मुक्त करण्यात आले होते. 8 जणांना शिक्षा झाली होती. त्यात जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सविस्तर साधनासाहित लिहिण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मूळ इंग्रजी निकालपत्राचे भाषांतर शालन रानडे यांनी केले आहे. आमदार शेखर निकम, प्रमोद कोनकर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version