| मुंबई | प्रतिनिधी |
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मार्च 2026 अंकाचे प्रकाशन महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे उपस्थित होते. ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या या अंकामध्ये विविध विषयांचा आशयपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या विषयावरील लेखांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. निसर्ग, समाज, संस्कृती, इतिहास आणि आधुनिक विज्ञान अशा विविध विषयांवरील लेखांचा समावेश अंकात करण्यात आला आहे. तसेच, मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचा समावेशही या अंकात करण्यात आलेला आहे.






