‘संवेदनशील चांदण्या’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

। खरोशी । वार्ताहर ।

साहित्यिक कवी लेखक सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एन.जे. पाटील यांच्या ‘संवेदनशील चांदण्या’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. काव्यप्रेमी शिक्षक संघ रायगड आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेण पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी पी.डी. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे नवी मुंबईचे माजी शिक्षणाधिकारी डी.आर. तायडे, लेखक व कवी एल.बी. पाटील, आगरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष पाटील, कवी एन.जे. पाटील, रत्नप्रभा पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सुधाकर पिंगळे,चंद्रकांत पाटील, म.वा म्हात्रे, अमरचंद पाटील, रविकांत ठाकूर एस.एस.पाटील, लवेंद्र मोकल, दिनानाथ पाटील, र.मो.पाटील आदी मान्यवरांसह केंद्रप्रमुख शिक्षक कवी लेखक व गोल्डन ग्रुपचे सभासद व पेणकर उपस्थित होते.

कार्यक्रम महात्मा गांधी वाचनालय पेण येथे आयोजित करण्यात आला होता.प्रास्ताविकात एस.एस.पाटील यांनी एन.जे.पाटील यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंचा उलगडा केला.व रूपरेषा सांगितली.यावेळी एन.जे.पाटील यांनी मनोगतात सांगितले की मी कवी कसा झालो लेखक साहित्यिक या क्षेत्रात काम करुन व खडतर प्रवासातून कसे साहित्य तयार झाले याविषयी माहिती दिली. यावेळी एल.बी पाटील रविकांत ठाकूर संदेश गायकवाड सुर्यकांत पाटील डी.आर.तायडे शिरीष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षीय भाषणात पि.डी.पाटील यांनी एन.जे पाटील यांच्या प्रती असलेली संवेदनशीलता व्यक्तिपरत्वे केलेले विविध उपक्रम व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता त्यांचा कवितासंग्रह निश्‍चितच समाज प्रबोधन करणारे व प्रत्येकाच्या अंतर्मनात राहणार्‍या आहेत. यावेळी अनेक कविंनी आपल्या कविता सादर करून मनाला उत्तेजना दिली व आनंद द्विगुणित केला. सूत्रसंचालन स्नेहलता वर्तक यांनी, तर आभार सुधाकर पिंगळे यांनी मानले.

Exit mobile version