पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील चरई येथील मूळचे रहिवासी असलेल्या अशोक महामुनी यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित त्यांची कन्या शीतल महेश माने यांनी लिहिलेल्या संघर्ष या पुस्तकाचे प्रकाशन वडीलांच्या दशक्रिया विधीवेळी आप्तस्वकियांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचे प्रकाशन करण्याची दुर्दैवी वेळ शीतल माने यांच्यावर आली. या संघर्ष पुस्तकाचे पत्रकार शैलेश पालकर यांच्या हस्ते करण्यात आले.
23 ऑगस्टला अशोक महामुनी यांचे अल्पशा आजाराने पोलादपूर येथे निधन झाले. यामुळे दशक्रियाविधी वेळी ्करण्यात आले.याप्रसंगी लेखिका शीतल माने, महेश माने, पोलादपूरचे स्विकृत नगरसेवक राजन पाटणकर, सीमा महामुनी, संदीप महामुनी व अभिजित महामुनी,कन्या आरती येवले,यांच्यासह स्नुषा अस्मिता व समिधा यांच्यासह आप्तपरिवार उपस्थित होता.