| सांगोला | माधवी सावंत |
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य मध्यवर्ती समितीच्या बैठकिच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली असून यावेळी स्व. गणपतराव देशमुख यांच्या गौरवास्पद कार्याची दखल घेणाऱ्या तीन पुस्तकांचे प्रकाशन सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येईल. यापुस्तकांमध्ये भाई जगन्नाथ लिगाडे यांचे माणदेश जनसेवक, कृष्णा इंगोले यांचे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व भाई गणपतराव देशमुख तर प्रा. डॉ. आप्पासाहेब पुजारी यांचे महाराष्ट्रातील यशस्वी सूत गिरणी या पुस्तकांचा समावेश आहे.