| कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या अमृतेश्वर मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यादिवशी अमृतेश्वर मंदीरात प्रभू श्रीराम मुर्तीची विधिवत पूजा अर्चा व अभिषेक करण्यात आला. यावेळी किर्तनकार अवनी गद्रे यांचे श्रीराम जन्मावर किर्तन झाले. यावेळी उमाकांत चोरघे, कुसूमाकर घुमकर, विद्याधर चोरघे, प्रभाकर निरकर, निरकरगुरुजी, विष्णू नागांवकर, उदय रणदिवे यांसह परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.