ससेक्स 4 विकेट्सने विजयी
| इंग्लंड | वृत्तसंस्था |
कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजाराने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-2 स्पर्धेत 86 आणि 44 धावांची खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पुजारा कसोटी संघाबाहेर आहे. त्याने 11 जून 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला. सध्या तो इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-2 स्पर्धेत खेळत आहे. पुजारा ससेक्सकडून खेळत आहे.
रविवारी ग्लॉस्टरशायर आणि ससेक्स यांच्यात खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील 12व्या सामन्यात पुजाराचे पहिल्या डावात शतक हुकले. पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 219 मिनिटे क्रीजवर घालवली. पुजाराने 148 चेंडूंत 8 चौकार मारत 86 धावा केल्या. त्याचे शतक हुकले. त्याला धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. ग्लॉस्टरशायरने पहिल्या डावात 417 धावा केल्यानंतर ससेक्सने पहिल्या डावात 479 धावा केल्या.
पुजाराने दुसर्या डावात 44 धावा करत ससेक्सला विजय मिळवून दिला. दुसर्या डावात ग्लॉस्टरशायर संघ दुसर्या डावात अवघ्या 205 धावांत गडगडला. प्रत्युत्तरात 144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ससेक्स संघ 155 धावांवर 6 गडी बाद झाला. त्यानंतर पुजाराने ससेक्सचा डाव सांभाळला आणि त्याने 126 मिनिटे फलंदाजी करत 102 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 44 धावा केल्या. या शानदार खेळीच्या जोरावर ससेक्सने हा सामना 4 गडी राखून जिंकला. पुजारा हा टेस्ट स्पेशालिस्ट मानला जातो. पुजारा 2010 ते 2014 पर्यंत सतत आयपीएल खेळला. त्याने 30 सामन्यांत 390 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 20.25 होती.