| पनवेल | वार्ताहर |
मोटरसायकलवरून आलेल्या चोरांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून ते पळून गेले. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली सक्सेना आणि त्यांचे पती हे प्रशांत कॉर्नर येथे मिठाई आणण्यासाठी गेले होत्या. मिठाई घेऊन येत असताना टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे झाडाच्या नर्सरीजवळ आले असता एक मोटरसायकल पाठीमागून येऊन त्यांनी मोटरसायकल आडवी लावली. यावेळी मागे बसलेल्या इसमाने सक्सेना यांचे मंगळसूत्र खेचून ते पळून गेले.