| पुणे | वृत्तसंस्था |
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि प्रेयसीच्या नवर्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत प्रेमीने प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचे 15 दिवसांनंतर उघड झाले आहे. निरगुडसर (ता.आंबेगाव) येथून 12 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करुन हत्या करण्याची धक्कादायक घटना (ता.11) ते (ता.24) डिसेंबर 2024 रोजी या दरम्यान घडली आहे. 24 डिसेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाणचा मृतदेह संगमनेरजवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत मिळून आला आहे. आरोपी राजेश जंबुकरनेही राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आर्यन चव्हाणचे अपहरण करणार्या आरोपीनीचे आर्यनचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राजेश जंबुकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून, त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.