मुरुडमध्ये प्लास्टिक बंदीची दंडात्मक कारवाई

। मुरूड । वार्ताहर ।
मुरुड जंजिरा नगर परिषदेतर्फे संपूर्ण शहरांमध्ये रिक्षा द्वारे नागरिक व व्यापार्‍यांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर व्यापार्‍यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार असे जाहीर करण्यात आलेले आहे. सर्व नागरिक दुकानदार आस्थापना यांना सुचित करण्यात येते की, केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने हवामान अधिसूचना 22 ऑगस्टला जारी केली आहे. अनुसार 1 जुलै 2022 पासुन पलास्टिकच वापर, उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणी वाटपावर बंदी असेल तरी सदरच्या सुचनांचे पालन करावे असे जाहीर आवाहन केले आहे.
उपरोक्त अधिसूचनेचे उल्लंघन करण्यावर माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उदयोग व्यवसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे, तसेच पहिला गुन्हा दंड रक्कम रू 5,000/-, दुसरा गुन्हा दंड रक्कम 10,000/, तिसरा गुन्हा दंड 25000/- आकारण्यात येईल, असे पालिकेने सुचित केले आहे.

Exit mobile version