पंजाबच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा!

। मुंबई । वृत्तसंस्था ।
पंजाबमध्ये काँग्रेसला धोबीपछाड देत आप स्वबळावर सत्तेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नव्हता. त्यामुळे पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आपच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळात एक महिला मंत्र्याला देखील स्थान देण्यात आले आहे. बलजीत कौर यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये आम आदमी पार्टीचे नेते हरपाल सिंह चीमा हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आज हरपाल सिंह चीमा यांच्यासह बलजीत कौर, हरभजन सिंह ईतो, विजय सिंघला, लाल सिंह कटरौचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरज्योत सिंह बैंस या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता भगवंत मान सरकारमधील मंत्रीमंडळाचा आज शपथविधी सोहळा पार पडला.

Exit mobile version