वीज बिल वसुली कर्मचार्‍याला धक्काबुक्की

महिन्यांतील दुसरी घटना
। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील नवे नगर परिसरामध्ये वीज बिलाची थकीत बाकी वसुली करणार्‍या महावितरण कंपनीच्या वायरमनला वीज ग्राहकाकडून मारहाण करण्यात आली असल्याची घटना घडली असून एका महिन्यामध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली. महाड तालुक्यातील ग्रामिण त्याच बरोबर शहरी भागातील वीज ग्राहकांकडून थकीत वीज बिलाची वसुली करण्याची मोहिम येथील वीज वितरण कपंनीकडून सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत गावांगावात कर्मचारी जाऊन वीज थकबाकी वसुली करीत असताना कांही गावांमध्ये कर्मचार्‍यांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. याच महिन्यामध्ये वरंध गावामध्ये वीज बिलाची थकीत बाकी वसुल करण्याकरीता गेलेल्या कर्मचार्‍यावर हल्ला करण्यात आला. मारहाण करण्यात आली. ग्राहकांने वीज बिलाची थकबाकी जमा केली नाही तर वीज जोडणी तोडण्याची कारवाई केली जात आहे.


महाड शहरामध्ये शनिवारी नवेनगर परिसरांत असलेल्या सिटी गार्डन या इमारती मधील तुषार सुरेश आठवले या ग्राहकाने वीज बिलाची रक्कम थकविल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यास गेलेल्या कर्मचार्‍याशी प्रथम शाब्दीक चकमक झाली, त्यानंतर धक्कबुकी झाली आणि शेवटी कर्मचार्‍याला मारहाण करण्यात येऊन त्याच्यावर हल्ला करण्यात आला अशी माहिती गोरेगाव येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तुकाराम पाचपोहे यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारी वरुन महाड शहर पोलिस ठाण्या मध्ये भादवी 353,341,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण
23 जानेवारी रोजी वरंध येथील राजेद्र वसंत धनावडे यांच्याकडे देखिल वीज बिलाची थकबाकी असल्याने आणि त्यांच्याकडून वेळेवर वीज बिल जमा न केल्याने त्यांच्याकडील वीज जोडणी तोडण्या करीता गेलेले वीज वितरण कपंनीचे वायरमन समीर मोरे गेले असता त्यांना देखिल मारहाण करण्यात आली होती. वारंवार कर्मचार्‍यांवर वीज ग्राहकांकडून जीवघेणे हल्ले होत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Exit mobile version