मराठी पाट्या लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा; शिवसेनेचा इशारा

| पनवेल | वार्ताहर |

महाराष्ट्र सरकार ने जारी केलेले निर्देश व सर्वच न्यायालयच्या आदेशानुसार, दुकानंवर मराठी भाषेतली पाटी असणे गरजेचे आहे. मात्र तरीही बऱ्याच ठिकाणी या आदेशाचे पालन होत नसल्याचे उघडपणे दिसत आहे. फक्त खारघर सेक्टर 34/35 मध्येच अश्या दुकानांची संख्या 40 पेक्षा जास्त असल्याची, शिवसेना पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात आढळले असून, पुढील आठवड्यातच (दि.27)फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगाभरात मराठी भाषा साजरा होत असून, अशी परिस्थिती महाराष्ट्र मध्ये राहून मराठी पाटी न लावणे, हि प्रत्येक महाराष्ट्र वासियांना शरमेचे बाब आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने आवाज उठवण्यात सुरवात केली आहे.

आज शिवसेना पक्षांमार्फत महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी कायदयाचे आणि मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या सर्व दुकानदारांना (दि.27) फेब्रुवारी पर्यंत मराठी नामफलक लावावे अन्यथा कारवाही ला सामोरे जावे अशी सक्त ताकीद दिली गेली. ह्या वेळेस शिवसेना पदाधिकाऱ्यांनी, आता प्रेमाने सांगतो. मात्र उद्या चूक सुधारली नाही तर कायदेशीर दणक्याला सामोरे जाण्याचे समजपत्र या सर्व 40 दुकानदारांना दिले आहे .

Exit mobile version