पी व्ही सिंधूची नॉकआऊटमध्ये धडक

हाँगकाँगच्या चेंग गँन यीचा केला पराभव
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केल्यानंतर महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा सहज पराभव केला. सिंधूने दोन सेटमध्येच गँन यीचा पराभव केला. सुरूवातीपासूनच सामन्यात बढत घेतलेल्या सिंधूचा हा टोक्यो ऑलिम्पिकमधील दुसरा विजय असून, तिने नॉकआउट फेरीत प्रवेश केला.
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवलं आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव केल्यानंतर सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत दुसर्‍या विजय मिळवला. ग्रुप स्टेजमध्ये पी.व्ही. सिंधूचा हाँगकाँगच्या चेंग गँन यीसोबत सामना झाला. यावेळी सिंधूने जबरदस्त प्रदर्शन करत सुरूवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली.
पी.व्ही. सिंधूने पहिला सेटमध्ये 21-9 अशा फरकाने आघाडी घेतली. 15 मिनिटं चाललेल्या पहिल्या सेटमध्ये हाँगकाँगच्या गँन यीकडून चुका झाल्या. याचा सिंधूने पुरेपूर फायदा घेत पहिल्याच सेटमध्ये सामना आपल्या बाजूनं फिरवला. दरम्यान, दुसर्‍या सेटमध्ये हाँगकाँगच्या चेंन गँन यीने वापसी केली. त्यामुळे पी.व्ही. सिंधूला तगडी फाईट द्यावी लागली.

धनुर्विद्येत तरुणदीप रॉयचा विजय
धनुर्विद्येत भारतासाठी आनंदाची बातमी आहे. राउंड ऑफ 32 मध्ये तरुणदीप रॉयने विजय मिळवला आहे. तरुणदीप रॉय आता पुढच्या राउंडमध्ये पोहोचला आहे. तरुणदीप रॉयकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. तरुणदीप रॉयने यापूर्वीच्या टीम इव्हेंटमध्येही उत्तम कामगिरी केली होती.

Exit mobile version