प्रा. डॉ. देवीदास रौंदळ सेवानिवृत्त

। मुरुड । वार्ताहर ।
कोकण उन्नती मित्रमंडळ संचलित मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. देविदास रौंदळ हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त महाविद्यालयात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विकास समितीच्या सदस्या वासंती उमरोटकर होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. विश्‍वास चव्हाण, प्रा.डॉ.जे .के.कांबळे, प्रा.डॉ.मुरलीधर गायकवाड, प्रा.डॉ. बहिरगुंडे, डॉ. बागुल, प्रा. सीमा मॅडम, प्रा. उदय पवार यांची भाषणे झाली. यावेळी प्रा.रौंदळ यांचा विकास समिती, महाविद्यालयाच्यावतीने सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष म्हात्रे यांनी केले. तर आभार प्रा.सिमा मॅडम यांनी मानले.

Exit mobile version