बीड जिल्ह्यात शेकापचा बंदला पाठिंबा

मोहन गुंड यांचे प्रतिपादन
बीड | प्रतिनिधी |
लखीमपूर खेरी येथील आंदोलनामध्ये शेतकरी नेत्याच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी 11 ऑक्टोबर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बीड जिल्हा शेकापने पाठिंबा जाहीर केला आहे.या बंदमध्ये कार्यकर्ते,नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन शेकाप नेते मोहन गुंड यांनी केलेे आहे.
तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दहा महिन्यांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू आहे.सरकारने पारित केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे व कामगार विरोधी संहिता आणि वीज सुधारणा विधेयक 2021 रद्द करण्याची मागणीसाठी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रातील आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे शेतकरी कामगार पक्ष बीडचे युवा नेते गुंड यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
लखीमपूर खेरी येथे झालेल्या निर्घृण हत्याकांडा प्रकरणी मुक्त आणि निष्पक्ष तपास होण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री (एमओएस) अजय मिश्रा यांनी त्वरित राजीनामा द्यावा. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींवर कसा दबाव आणला जातो धमक्या दिल्या जातात, तपास न्यायपालिकेच्याच देखरेखी खाली व्हावा आणि सर्वोच्च/उच्च न्यायालयाच्या सिटिंग जज द्वारे तपासणी व्हावी या मागणीसाठ शेतकरी कामगार पक्ष ने महाराष्ट्र बंदला समर्थन दिले त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते मोहन गुंड यांनी केले आह

Exit mobile version