म्हसळा नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

राष्ट्रवादी १७, शिवसेना ६, भाजप ८ कोंग्रेस १०, आणि अपक्ष ४
। म्हसळा । उदय कळस ।
म्हसळा तालुक्यातील नगरपंचायतीच्या २१ डिसेंबर व १८ जानेवारी ला झालेल्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. निवडणुकीसाठी ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यातील राष्ट्रवादी १७, शिवसेना ६, भाजप ८ कोंग्रेस १०, शेकाप ३, आणि अपक्ष ४ असे अर्ज दाखल करण्यात आले होते.

म्हसळा नगर पंचायतीमध्ये एकूण १७ प्रभाग आहेत १७ प्रभाग मध्ये राष्ट्रवादींनी १७ ठिकाणी आपले उमेदवार रंगणात उतरवले होते. म्हसळा नगरपंचायत १७ पैकी राष्ट्रवादी १३, शिवसेना २, आणि कोंग्रेसचे २असे उमेदवार निवडून आले. परंतु सत्ता जरी राष्ट्रवादी कडे असली तरी सत्तेत विरोधक मात्र खमके आहेत त्याच्यामध्ये कोंग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख तर उच्च शिक्षित सुफीयान हळदे तर शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना पानसरे, राखी करंबे या विरोधी पक्ष म्हणून काम करणार्‍या सक्षम असल्याने राष्ट्रवादिला सत्तेत प्रश्न विचारणारे नगरसेवक असल्याने सत्ता चालविण्यास कसरत करावी लागणार आहे पराभूत उमेद्व्रांमध्ये कोंग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र दळवी हे एक मताने पराभूत झालेत तर राष्ट्रवादीचे मुबिन हुर्जुक हे ३ मताने पराभूत झाले तर भाजपच्या हाती काही आले नाही अपक्षांचा मात्र पत्ताच कट राष्ट्रवादी पक्षाने मागील विजयी झालेल्या नगरसेवकांना उमेदवारी देऊन चांगल्या मताधिक्याने विजयी करण्यात आले त्यामध्ये माजी नगरअध्यक्षा जयश्री कापरे यांना ७४ मत मिळवून विजयी झाले तर माजी उपाध्यक्ष संजु कर्णिक यांना ३२७ मत मिळवून विजयी झाले आहेत. तर शेकाप पक्षाने आपली ताकद तालुक्यात दाखवून दिली. त्यामध्ये शेकाप पक्षाचे उमेदवार तांबे जमीर यांनी सर्वाधिक ९३ मते घेऊन आपले अस्तित्व सिद्ध केले आहे तर घरटकर आफ्रिन शादाब यांनी ४९ मते घेतली आहे तर माळी शीतल सुदाम यांनी १९ मते घेतली आहेत. एकंदरीत म्हसळा शहरामध्ये प्रथमच शेकाप पक्षाला लोकांनी पसंती दाखवलेली आहे तर भाजपला पुर्णपणे नाकारले आहे. भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संतोष पानसरे यांना केवळ ३ मतावरती समाधान मानावे लागले आहे. तर भाजपचे सचिन करडे यांना ४२ मते मिळवून केवळ १५ मताने पराभव स्वीकारवा लागला तर सरिता पानसरे यांना ४९ मत घेवून २५ मताने पराभव स्वीकारवा लागला. वंचित बहुजन आघाडी वस्ता मोहम्मद ६ मते घेतली आहेत.

Exit mobile version